पोलिस उपायुक्त बगाटे यांची पुन्हा धडाकेबाज कारवाई, रेतीची अवैध वाहतूक करणारे 5 हायवा व 2 जेसीबी जप्त

 0
पोलिस उपायुक्त बगाटे यांची पुन्हा धडाकेबाज कारवाई, रेतीची अवैध वाहतूक करणारे 5 हायवा व 2 जेसीबी जप्त

पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांची धडाकेबाज कारवाई, अवैध रेती वाहतूक करणारे 5 हायवा, 2 जेसीबी जप्त

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई करत उशिरा रात्री दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेतीची अवैध उत्खनन करणारे 5 हायवा, 2 जेसीबी रेतीची उत्खनन करताना छापा मारल्याने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

झोन-1 चे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह एक दोन पोलिस अधिकारी व 5 पोलिस अंमलदार यांनी आता छापा टाकला असता उत्खनन यंत्र जप्त करुन दौलताबाद पोलिस ठाण्यात आणले जात आहे. यावेळी एक चालक पळून गेला आहे. एकूण अंदाजे 2 कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केले व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्वतः बगाटे यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow