S I R करण्यासाठी मुदतवाढ दिल्लीसाठी महाराष्ट्रासाठी नाही...!

 0
S I R करण्यासाठी मुदतवाढ दिल्लीसाठी महाराष्ट्रासाठी नाही...!

मुदतवाढचे आदेश दिल्लीसाठी आहे महाराष्ट्रासाठी आहे नजरचुकीने हि बातमी प्रकाशित केली त्याबद्दल वाचकांशी दिलगीर आहोत...

दिल्लीच्या मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली, दि. 16(डि-24 न्यूज)- भारत निवडणूक आयोगाने दिल्लीतील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. 1 जुलै 2026 ही पात्रता तारीख (Qualifying Date) निश्चित ठेवून ही सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या विनंतीनुसार सुधारित कार्यक्रम निश्चित केला असून त्यानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडून घराघर सर्वेक्षण 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहे. मतदान केंद्रांचे पुनर्रचना व पुनर्व्यवस्थापन 8 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण केले जाईल.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदार यादीचा प्रारूप मसुदा 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. दावे व हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान पार पडेल.

त्यानंतर 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या सुधारित कार्यक्रमाची माहिती सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पक्षांना देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून, विविध माध्यमांतून या वेळापत्रकाचा व्यापक प्रसार करण्यासही सांगितले आहे.

S I R मुदतवाढ दिल्लीसाठी निवडणूक आयोगाने दिली आहे. महाराष्ट्रासाठी नाही नजरचुकीने हि बातमी प्रकाशित झाली त्याबद्दल दिलगिर आहोत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी मुदतवाढ दिल्याचे पत्र निघाल्यावर सुधारीत बातमी पुन्हा प्रकाशित केली जाईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow