ओबीसींचे 100 तर अनुसूचित जातीचे 50 आमदार निवडून आणा... बाळासाहेब आंबेडकरांचा बुलंद नारा......!
आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसींनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी
उतरावे- बाळासाहेब आंबेडकर
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) ओबीसी आरक्षण वाचवायचे की जावू द्यायचे हे ओबीसींनी ठरवावे. सरंजामी मराठा आणि रयत मराठ्यांच्या भांडणात ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात असून धर्म नाही तर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण वाचवायचे की त्याचा बळी द्यायचा हे ओबीसी बांधवांनी ठरवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरावे. आंबेडकरी समाज कायम त्यांच्यासोबत राहणार असल्याचे प्रतिपादन ऐतिहासिक आमखास मैदानावर आरक्षण बचावो यात्रेच्या समारोप प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले ओबीसी समाजाचे शंभर तर अनुसूचित जाती जमातीचे पन्नास आमदार निवडून दिले तरच आरक्षण वाचेल. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. असे आदेशच कार्यकर्त्यांना जाहीर सभेत आंबेडकरांनी दिले.
आरक्षण हा सामाजिक प्रश्न असून यामध्ये राजकारण होवू नये. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे हि वंचितची भुमिका आहे. परंतु इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले पाहिजे. त्याच भुमिकेतून मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यांनी ओबीसीतून आरक्षणाचा हट्ट धरला आहे. हि मागणी चुकीची आहे. यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आहे. राजकीय पक्षांनी भुमिका घेतली नसल्याने समाजाने भुमिका घेवून ओबीसींवर हल्ले सुरू केले तर काही ठिकाणी बहिष्कार टाकला त्यामुळे राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ असल्याने त्यामध्ये अधिक तीव्रता येणार होती. हि परिस्थिती बदलण्यासाठी वंचितने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. या यात्रेत ओबीसींमध्ये विश्वास निर्माण होऊन तणावाची परिस्थिती निवळल्याचा दावा आंबेडकरांनी केला. आरक्षणाचे संकट टळलेले नाही. पूर्वी राजकीय आरक्षण संपुष्टात आले. म्हणून हे आरक्षण वाचवायचे की जावू द्यायचे हे ओबीसींनी ठरवावे. ओबीसी पुढे आल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. जो पक्ष ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभा राहिल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. विधानसभा हि शेवटची संधी असून एकदा ओबीसी आरक्षण संपुष्टात आले तर ते मिळणार नाही.
वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचावो यात्रा मुंबईतून चैत्यभूमी येथून निघाली होती त्या यात्रेचा आज समारोप झाला.
मनोज जरांगे पाटील हे गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. जरांगेंच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत गरीब मराठ्यांच्या नाही तर सरंजामी मराठ्यांच्या बाजूने शक्ती उभी केली.
त्यामुळे निवडून आलेले 31 मराठा लोकसभा सदस्य हे श्रीमंत व कारखानदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगेनी खरच गरीब मराठ्यांना उभे केले तर महाराष्ट्र सरंजामी मराठ्यांपासून मुक्त होईल. त्यांची ओबीसी आरक्षणातून आरक्षण मिळवण्याची मागणी चुकीची आहे. आरक्षणावर भुमिका घेण्याची वेळ आली तर शरद पवार शांत बसले. या मुद्यावर राज्यात तणावाची स्थिती असताना ते बाहेर पडले नाही. आता मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी धडपड करत आहे. भाजपा कधीही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने नाही त्यांनी नेहमी ओबीसी आरक्षणाचा विरोध केला. हे आरक्षण धोक्यात आले तरी भुमिका घेत नाही. तरीही ओबीसी नेते आणि ओबीसी जनता भाजपाला भरभरून मतदान करतात अशी टीका यावेळी आंबेडकरांनी केली.
या सभेत हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. शहरात मोठमोठे बॅनरने शहर सजले होते. "55 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द करा" "ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणार" हा मजकूर लिहिलेल्या बॅनरची चर्चा शहरात सुरू होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिध्दार्थ मोकळे यांनी केले. व्यासपीठावर वंचितचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अंजलिताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, किसन चव्हाण, फारुख अहेमद, सर्वजित बनसोडे, निलेश विश्वकर्मा, अमित भुईगळ, प्रियदर्शी तेलंग, नवनाथ वाघमारे, अरुंधतीताई सिरसाठ, योगेश बन, प्रभाकर बकले, अफसरखान, जावेद कुरैशी, जलिस अहेमद, मतीन पटेल यांच्यासह ओबीसी नेते व वंचितचे नेते उपस्थित होते.
English News... D24NEWS
OBCs should decide whether to save reservation or let it go:Adv Ambedkar
Chhatrapati Sambhajinagar,Aug 7 Vanchit Bahujan Agadhi (VBA) Chief Adv Prakash Ambedkar on Wednesday said that, OBC reservation is being sacrificed in the feud between Saramjami Marathas and Rayat Marathas and reservation of OBCs is in danger not religion.
Therefore, whether to save reservation or to sacrifice it, the OBC brothers should participate in the upcoming assembly elections.
He was speaking on the occasion of his 'OBC Aarakshan Bachav' Yatra concluding here at Aamkhas Maidan here on today which was starts from July 25 onwards in the state.
Adv Ambedkar, asserted that the Ambedkari society will always be with him. Reservation of OBCs will be saved only if 100 MLAs from OBCs and 50 MLAs from Scheduled Castes and Tribes are elected in assemblly elections. Therefore, the workers were also instructed to start the election work from now.
Speaking further on this occasion, Adv Ambedkar said that reservation is a social issue and it should not be politicized. Poor Marathas should get reservation, it is the role of the underprivileged. But any other reservation should be given without prejudice. From the same position, Manoj Jarange's demand for reservation was initially supported. But they are adamant about the demand for reservation from OBCs. This demand is wrong and this will jeopardize the reservation of OBCs,he pointed out.
As no political party took a stand regarding this demand, the community took a stand and started attacking the OBCs and boycotted some places. Due to this, an atmosphere of terror was created in the state. Due to the assembly elections, this would become more intense.
To change this situation, VBA took out the OBC Reservation Rescue Yatra.
Adv Ambedkar claimed that due to this yatra, which went all over the state, confidence has been created among the OBC brothers and the situation of tension has been resolved.
However, the crisis on reservation is not over. Earlier political reservation was abolished. Now the remaining reservation is also in danger of going. So OBCs should decide once and for all whether to let this reservation go or to save it,he said.
Adv Ambedkar criticized NCP-SP chief Sharad Pawar for remained silent stance on Maratha and OBC reservation issue and now struggling to make his girl as Chief Minister.
Adv Ambedkar also not spared to BJP and said BJP is never on the side of OBCs.BJP has been opposing the Mandal Commission and OBC reservation since earlier. Even when OBC reservation is threatened, BJP does not take a stand. Still, he questioned why OBC leaders and OBC people vote for BJP in abundance,he added.
On this occasion, state president Rekha Thakur, Anjalitai Ambedkar, Kisan Chavan, Sarvajit Bansode, Farooq Ahmed, Nilesh Vishwakarma, Amit bhegal, Arundhati sirsat, Yogesh ban, Prabhakar bakle, Afsarkhan, Javed quraishi, Jalis Ahemed, Matin patel among several others were present.
What's Your Reaction?