कॅन्सरवरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

कॅन्सरवरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ), दि.18(डि-24 न्यूज) देशभरातील जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करणार, कॅंन्सरचे निदान पहिल्याच टप्प्यात कळले तर उपचार करणे सोपे होईल. यावर नवीन लस तयार होत आहे. ज्यामुळे महिलांना ब्रेस्ट कन्सर होणार नाही. याशिवाय सध्या त्यावरील औषध देखील देशात निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात यासाठी भरपूर तरतूद करण्यात आली असून विविध योजनांसाठीही बजेट अतिशय समर्पक झाले असल्याची माहिती केंद्गीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते आज दौ-यावर आले असताना माध्यमांशी संवाद साधला.
केंद्गीय अर्थसंकल्पाबाबत विविध मंत्री देशभर जावून योजनांविषयीच्या तरतुदी व योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्ग सरकार काय करत आहे या विषयी माहिती देत आहेत.
प्रतापराव जाधव पुढे म्हणाले, केंद्ग सरकारने 36 औषधींवरील सीमा शुल्क कमी करण्याचे काम सरकारने केले आहे. औषधी स्वस्त दरात करण्याचे काम केले जात आहेत. 13 नवीन योजना सुरू केल्या जात आहेत. आयुष मंत्रालय बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता विषय आहे. प्राचीन आरोग्य पद्धती सुरू करण्याचा प्रयत्न आहे. आयुष मंत्रालयात त्यांचा समावेश केला आहे. 2014 पासून हा विभाग सुरू करण्यात आला आहे. आधी योग साधना ही विद्या माहित नव्हती मात्र आता 170 देश योग दिवस साजरा करतात. आयुर्वेद उपचार घेण्यास सुविधा मिळावी यासाठी वैद्यकीय केंद्रात सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयुष्य ग्राम माध्यमातून नवीन केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. आयुर्वेदाचे रुग्णालय मंजूर करून देण्यात येणार आहेत, तर नवीन आयुर्वेदाचे नवीन दोन महाविद्यालय मंजूर केले आहेत. वेलनेस सेंटर माध्यमातून पर्यटन वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यातही एक वर्षाचा व्हिसा सोप्या पद्धतीने दिला जात आहे. मागील वर्षी 40 हजार लोक परदेशातून देशात आले आहेत. प्राचीन उपचार पद्धती वाढवण्यासाठी देश का प्रकृती प्रशिक्षण योजनेची घोषणा केली आहे.
MSAME अनेक बदल केले जात आहेत. छोट्या उद्योगांना 5 लाखांचे क्रेडिट कार्ड होते ते 10 लाख केले जात आहे. नवीन उद्योगांना स्टार्टअप साठी विस्तारित निधी देत असून 10 हजार कोटींची तरतूद केली आहे. महिलांना विशेष प्रावधान असून दोन कोटींचे अर्थसाह्य देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक शाळेत अटल लॅब सुरू करणार आहेत. तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी पहिल्या वर्षी 50 हजार शाळांमध्ये लॅब सुरू करण्यात येणार आहेत. AI चे प्रशिक्षण शाळांमधे सुरू करणार. नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी मुलांना शिकवण दिली जाईल.
लहान विमानतळ तयार करून त्याद्वारे सुविधा मिळणार आहेत. 120 विमान तळांवर ही सुविधा आणि वाहतूक सुरू करून जलद प्रवास सुरू केला जाणार आहे. मोठ्या शहरात वाहतुकीचा त्रास आहे, त्यासाठी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात मेट्रो रेल्वे सुरू केल्या जात आहेत. हरित प्रवासी सुविधा देण्यासाठी, रेल्वेसाठी, ग्रामीण जोड सुविधा तरतूद करण्यात आली आहे. 17500 नवीन कोच रेल्वेत सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील काही रेल्वेस्टेशन अमृत स्टेशन म्हणून आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
What's Your Reaction?






