नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागात ऑटोक्लेव्ह मशिनचे उद्घाटन केले अधिष्ठातांनी

 0
नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागात ऑटोक्लेव्ह मशिनचे उद्घाटन केले अधिष्ठातांनी

नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागात ऑटोक्लेव्ह मशिनचे उद्घाटन

अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याहस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथे नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागात ऑटोक्लेव्ह मशिनचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याहस्ते करण्यात आले. लोकार्पणप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी विभागासाठी गेल्या पून्हा एक नवीन मशिन देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना डॉ. सुक्रे म्हणाले की, घाटीतून खासगी रूग्णालयात रुग्ण रेफर होण्याचे प्रमाण घटले आहे. आता खासगी रुग्णालयातील रूग्ण घाटीत दाखल होतात, कारण येथे मिळणार्‍या सुविधा, सेवा आणि डॉक्टर, स्टाफ यांच्यामध्ये रूग्णाप्रती असलेला सेवाभाव. मात्र, या विभागात शस्त्रक्रिया वाढविण्यासाठी प्रयत्न करा, बाकी लागेल ते यंत्रसामुग्री, औषधी पुरविण्याची जबाबदारी संस्थाप्रमुख म्हणून पार पाडेल अशी ग्वाही डॉ. सुक्रे यांनी दिली. या विभागासाठी मंत्रालयाकडे 9 कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठवला असून, तो मंजुर करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे पाटील यांनी विभागासाठी मागितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला मिळत गेली. घाटीत ‘सुक्रे पॅटर्न’ खरोखर अधोरेखित होत असल्याची विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 12 वर्षांपुर्वीची जुनी मशिन खराब झाल्याने दोन वर्षांपासून मागणी केली असताना पूर्तता झाली नाही. मात्र, आता काही दिवसांपुर्वीच केलेली ऑटोक्लेव्ह मशिन तातडीने मंजुर झाली, हे विभागासाठी सकारात्मक काम आहे. रुग्णसेवेसाठी विभाग बांधील असून, सर्वांचे सहकार्याने विभागाची प्रगती सुरू असल्याचे डॉ. अर्चना वरे पाटील म्हणाल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल डॉ. अर्पिता यांनी तर आभार तपन जक्कल यांनी मानले. उदघाटनप्रसंगी अधिष्ठाता कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुरेश हरबडे, उपअधिष्ठाता डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. प्रभा खैरे, डॉ. शुभा झवर, डॉ. वेणूकुमार रंगू, डॉ. महेश सोनपेठकर, मेट्रन संजीवनी गायकवाड-गवळी आदीसह सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow