डाॅ.शोएब हाश्मी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा...

डॉ. शोएब हाश्मी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संघटक तथा एशियन हॉस्पिटलचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शोएब हाश्मी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
डॉ. हाश्मी यांच्या वतीने विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि अंध व अपंग मुलींचे वसतिगृह आदी ठिकाणी किराणा किट व अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली. समर्थनगर येथील मुक्तिसोपान वृद्धाश्रम, एड्सग्रस्त बालक आश्रम शिवशंकर कॉलनी, संत भगवानबाबा बालिकाश्रम बीड बायपास, पडेगाव अनाथाश्रम, सिडको येथील अंध व अपंग मुलींचे वसतिगृह आदी ठिकाणी किराणा कीट, अन्नदान वाटप केले. याप्रसंगी शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडी व अभिष्टचिंतन सोहळा समिती व मित्रपरिवार उपस्थित होते. एशियन हाॅस्पिटल येथे त्यांच्या चाहत्यांनी त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






