अल्पवयीन मुलगी बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन...

 0
अल्पवयीन मुलगी बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन...

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)-पैठण येथून दि. 21 ऑगस्ट रोजी ब्युटी पार्लरला जाते असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून या मुलीस फूस लावून पळवून नेले असल्याबाबत फिर्याद पैठण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार अनिकेत उद्धव कनसे रा. फकीरवाडा पैठण याचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपनिरीक्षक पी.बी.यादव यांनी कळविले आहे. यामुलीचे नाव भारती गणेश सानप असे असून रंग गोरा, उंची 5 फुट 6 इंच, अंगात पांढऱ्या व गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, व पांढरा स्कार्प, काळी सॅंडल. असे असून या वर्णनाची मुलगी आढळळ्यास पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम.बी.गोमारे- 9049980755 व पोलीस उपनिरीक्षक पी.बी. यादव -9767707651 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow