अंमली पदार्थ विक्री करणा-या आरोपिंना पुन्हा कटकट गेट, रहेमानिया काॅलनीत आणले...

 0
अंमली पदार्थ विक्री करणा-या आरोपिंना पुन्हा कटकट गेट, रहेमानिया काॅलनीत आणले...

अंमली पदार्थ विक्री करणारे आरोपींना तपासासाठी कटकट गेट, रहेमानिया काॅलनीत...बघ्यांची गर्दी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4 (डि-24 न्यूज) - 

गणेशोत्सव काळात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या चार आरोपिंना मुकुंदवाडी पोलिसांनी कटकट गेट व रहेमानिया काॅलनी परिसरात तपासासाठी आणले होते. नशेसाठी चरसची विक्री करणाऱ्या 5 जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यातीलच हे चार आरोपी असल्याची माहिती एपिआय संजय बहुरे यांनी यावेळी दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत 1 किलो 440 gm चरस व मुद्देमाल एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. एकुण सहा आरोपींवर एनडिपिएस कायद्याअंतर्गत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली एक आरोपी फरार आहे. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रीय आहे. आज दुपारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे एपिआय संजय बहुरे व सहका-यांनी तपासासाठी कटकट गेट, रहेमानिया काॅलनी व अल्तमश काॅलनी आरोपिंच्या घरी आणले होते. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. पालकांनी सावधगिरी बाळगून आपल्या मुलांना नशेच्या आहारी जावू नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी एपिआय संजय बहुरे यांनी केले. 

काही दिवस अगोदर मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे नशेखोरांना चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या मोहम्मद मुजम्मील मोहम्मद नजीर (वय 34 वर्ष) राहणार रहेमानिया काॅलनी, लुमान ऊर्फ नोमान खान इरफान खान (वय 21 वर्ष) दोघे राहणार रहेमानिया कॉलनी, मोहम्मद लईखुद्दीन मोहमद मिराजोद्दीन (वय 25 वर्ष), राहणार रहीमनगर, शेख रेहान शेख अश्फाक (वय 19 वर्ष), रा. कटकटगेट आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन अशा 5 जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीची दिड किलो चरस आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपीविरुध्द अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंधकात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 1 सप्टेंबर रोजी यातील आरोपिंची अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख श्रीमती गिता बागवडे यांनी धिंड काढली होती. आज पुन्हा आरोपिंना हथकड्या टाकूण येथे तपासासाठी आणले असता खळबळ उडाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow