शहर पोलिस दलात खांदेपालट, 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

शहर पोलिस दलात खांदेपालट, 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
औरंगाबाद , दि.19(डि-24 न्यूज ) शहर पोलिस दलात पुन्हा एकदा खांदेपालट करीत पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशाने शनिवारी 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या ठिकाणी पोलिस निरीक्षकांना तात्काळ हजर राहण्याचे आदेशही पोलिस आयुक्त लोहिया यांनी दिले आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदलीसोबतच सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
वाळूज पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांची सिडको पोलिस ठाण्यात, दिलीप गांगुर्डे यांची वाळूज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांची हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. हर्सूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांची वाहतूक शाखा एकच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांची सातारा पोलिस ठाण्यात. छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक सचिन इंगोले यांची वाळूज वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. कोर्ट मॉनिटरींग सेलचे निरीक्षक राजेश यादव यांची हायकोर्ट सुरक्षा विभागात तर पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमे यांची हायकोर्ट सुरक्षेतून कोर्ट मॉनिटरींग सेलच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






