अवैध वेश्याव्यवसायचा पर्दाफाश, चार महिलांची सुटका, नवनीत काॅवत यांच्या पथकाची आणखी एक धडाकेबाज कारवाई

वेश्याव्यवसाय रैकेटचा पर्दाफाश, नवनीत काॅवत यांच्या पथकाची आणखी एक धडाकेबाज कारवाई
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत यांना गुप्त बातमीदाराकडून सातारा परिसरातील सीआर रेसिडेन्सीत अवैध वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भागिले, पोलिस उपनिरीक्षक विनोद अबुज, सुरेश जारवाल, पोह शोन पवार, पोना संदीप क्षीरसागर, पोअं श्रीकांत काळे, पोह योगेश गुप्ता, पोअं सागर पांढरे, दिपक शिंदे, महीला पोलिस हवालदार सुनिता गूमलाडू, कवाळे, भावे यांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून कुंटनखान्यावर छापा टाकला. सिआर रेसिडेन्सीच्या प्लॅट क्रं.3 मध्ये हा कुंटणखाना सुरू होता. कुंटणखाना चालवणारा शरद संजय साबळे, वय 29, हे.मु.सिआर रेसिडेन्सी, उमा गोपालनगर, सातारा परिसर, मुळ गाव नवेगाव, इंदिरानगर, जळगाव, तिच्या सोबत रोहिणी शरद साबळे, वय 21, या दोघांना ताब्यात घेतले. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला कोठून आणले हि विचारणा केली.
शरद साबळे याची नातेवाईक माधुरी थोरात, राहणार इटखेडा, हिच्या घरी आणखी एक महिला ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली. माधुरी थोरात हिच्या फ्लॅट वरुन चार महिलांची सुटका करण्यात आली. वेश्याव्यवसाय चालविण्याच्या प्रकरणात शरद साबळे, रोहिणी साबळे, माधुरी थोरात या तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत काॅवत यांच्या पथकाने हि धडाकेबाज कारवाई केली आहे.
या अगोदर सिडको परिसरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणले. त्यानंतर स्पाच्या नावाने देहविक्रीच्या व्यवसायाचा या पथकाने पर्दाफाश केला. इटखेडा भागातील काॅवत यांच्या पथकाने हि पाचवी धडाकेबाज कारवाई केली आहे.
What's Your Reaction?






