अल्पसंख्याक समाजावरील अन्यायाविरुद्ध धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते काही बोलत नाही, निवडणूक आली तर मतांची भीक मागणार - ओवेसी

 0
अल्पसंख्याक समाजावरील अन्यायाविरुद्ध धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते काही बोलत नाही, निवडणूक आली तर मतांची भीक मागणार - ओवेसी

अल्पसंख्याक समाजा वरील अन्यायाबाबत धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते काही बोलत नाही, निवडणूक आली की मतांची भीक मागणार - बॅरिस्टर ओवेसी

इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार याबाबत केले मोठे विधान.... शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, दिल्लीत सुरू आंदोलनाला पाठिंबा देत ओवेसींनी सांगितले स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने लागू करावे, एमएसपीवर सरकारने कायदा बनवावा अशी मागणी त्यांनी केली....

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) देशात व राज्यात अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते काही बोलायला तयार नाही. निवडणूक आली तर मतांची भीक मागणार अशी परिस्थिती सेक्युलर पक्षाची देशात झाली आहे.

उत्तराखंड राज्यात युसीसी बील पास झाले काँग्रेस चुप, दिल्लीत सहाशे वर्षे जुनी मस्जिद कब्रस्तान तोडण्यासाठी जी कार्यवाही तर मुंबईत मिरा रोड येथे एका समाजाच्या दुकानांवर शिंदे सरकारच्या वतीने एकतर्फी बुलडोझर कार्यवाही केली त्याबद्दल बोलायला तयार नाही. काही संघटनांच्या वतीने लव्ह जिहाद विरोधात हिंदू जागरण रैली काढण्यास परवानगी दिली जाते. एका विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य केले जाते. सर्वोच्च न्यायालयाने असल्या वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचे आदेश दिले तरीही कार्यवाही केली जात नाही. मिरा रोड येथे एमआयएमचे नेते वारीस पठाण यांना येण्यासाठी नोटीस दिली जाते आणि भाजपाच्या नेत्यांना तेथे भाषण करण्याची परवानगी दिली जाते हा अल्पसंख्याक समाजावर अन्याय नाही का म्हणून अन्याय झालेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. पक्षाच्या वतीने याबाबत निर्णय घेतला जाईल. लोकसभेच्या किती जागेवर उमेदवार उभे करणार पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत एमआयएमचे सुप्रीमो तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.

याप्रसंगी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकी समोर असताना काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले आता हि विचारधारेची लढाई आहे. काँग्रेसकडे आता विचारधारा उरली नाही. कोण कोणत्या पक्षात काही कळेनासे झाले आहे. सेक्युलर पक्ष सध्या जी भुमिका घेत आहे त्यांचे खायाचे दात वेगळे दाखवायचे वेगळे असल्यामुळे काँग्रेसचे जे नेते भाजपात जात आहे त्यांनी भाजपाच्या विचारधारेविरोधात लढणे तर सोडा भुमिकेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जनता आता हुशार झाली आहे. अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री राहिले तेही भाजपात गेले, मुरली देवरा शिंदे गटात गेले, बाबा सिद्दिकी अजित पवार गटात गेले मग कोठे आहे सेक्युलॅरिझम. आमच्यावर टिका करणारे बेनकाब झाले आहे. अशी टीका त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केली. मुस्लिम समाजाचा आता पंतप्रधानावर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या काळात अल्पसंख्याक समाजावर अन्याय वाढले असा आरोप त्यांनी भाजपावर केला. 

औरंगाबाद येथील नागरिकांचे ओवेसींनी आभार मानले उच्चशिक्षित इम्तियाज जलील यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत निवडून दिले होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वात जास्त प्रश्न लोकसभेत विचारले. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अनुसूचित जाती जमाती आरक्षण, शेतक-यांचे प्रश्न, अल्पसंख्याक समाजाचे उपस्थित केले. किराडपूरा दंगल जीवाची पर्वा न करता रोखली, अनेक विकासकामे इम्तियाज जलील यांनी मतदारसंघ केली असे उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी लोकसभेत हवेत. इंडिया आघाडीच्या ऑफरवर म्हणाले आतापर्यंत काही निमंत्रण मिळाले नाही तर इम्तियाज जलील यांनी तर सोबत घेण्याचे खुले आवाहन दिले होते तरी काही प्रतिसाद महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिले नाही. पक्षाच्या वतीने स्वबळावर लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात असल्याचे ओवेसी म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow