शहरात पतसंस्था घोटाळ्याची मालिका काही थांबेना, काँग्रेसचे माजी आमदार अडकले...!

 0
शहरात पतसंस्था घोटाळ्याची मालिका काही थांबेना, काँग्रेसचे माजी आमदार अडकले...!

शहरात पतसंस्था घोटाळ्याची मालिका काही थांबेना, काँग्रेसचे माजी आमदार अडकले

आदर्श नंतर अजिंठा अर्बन को.बंँकेत अपहार झाल्याचा ठपका, अध्यक्षांसह तीन जणांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) आदर्श पतसंस्थेनंतर अजिंठा अर्बन को.बँकेत अपहार झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, सिए सतीश मोहरे यांच्यासह 2006 ते 2023 कालावधीत संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 18 ऑक्टोबर रोजी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. हजारो खातेदार हतबल झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने आणलेल्या या बँकेत 97.41 कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारीत म्हटले आहे संचालक मंडळाने आपसात संगनमत करून विनातारण 36 खातेदारांना कर्ज दिले आहे.

विनातारण यांना मिळाले कर्ज

महेश खंडेलवाल, वंश ढोका, सुरेंद्र जैन, रमेश टकले, डी.आर.पाटील, एस.एस.जैन, साधना अग्रवाल, सुभाष अग्रवाल, रमेश जाधव, विमल मिश्रा, परेश जैन, सुभाष जैन, राजू बाचकर, घेवरचंद सुराणा, विनोद पाटणी, पद्माकर जोशी, दमाले पाटील, एस.एस.पवार, उत्तम गायकवाड, हेमलता सुराणा, राहुल गुजर, रंगनाथ कुलकर्णी, रेश्मा संदीप बोरा, संतोष सहकारे, सि.टि‌.सक्सेना, नौसिबा सबा, संतोष पाटील, जगन्नाथ पाटील, मथाजी गोरे, सुनंदा जैस्वाल, पोपट साखरे, महेश जसोरिया यांना विनातारण कर्ज वाटप केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

औरंगाबाद शहरातील जाधववाडी व उस्मानपुरा येथे या बँकेचे दोन शाखा आहेत. गोपनीय पत्राद्वारे 28 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातले.

वादग्रस्त आर्थिक व्यवहारांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या बँकेत स्वनिधी व सिआरएआर यात मोठा फरक दिसून आला होता. स्वनिधीत 70.14 कोटी तर सिआरएआर मध्ये 38.30 कोटींचा फरक समोर आला. 36 खातेदारांना खोटे मुदतठेव व तारण दाखवून 64.60 कोटींचे कर्ज वाटप केले. जे असुरक्षित होते. हि बाब 23 डिसेंबर 2022 रोजी बँकने रिझर्व्ह बँकेला दिलेल्या पत्रात मान्य केले आहे. 31 मार्च 2023 रोजी बँकने 32.81 कोटी रुपये एसबिआय, एक्सिस व एमएससी बँकेत खोटे व बनावट बँक बाकि प्रमाणपत्र सिएकडे सादर केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सिएने खोटा हिशेब दाखवून ताळेबंद तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या बँकेत घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने खातेदार हवालदिल झाले आहे. आदर्शच्या खातेदारांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही प्रक्रीयेत वेळ जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घोटाळ्यामागून घोटाळे एकामागून एक उघड होत आहे याला कधीतरी चाप बसणार की नाही गोरगरीबांना नेहमी याचा आर्थिक फटका बसत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow