मुकुंदवाडी परिसरातून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त, आरोपी अटक...

मुकुंदवाडी परिसरातून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त, आरोपी अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) -मुकुंदवाडी पोलिसांनी गावठी पिस्तूल (देशी कट्टा) व दोन जिवंत काडतुसेसह एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी 10 ते 10.40 वाजेदरम्यान मुकुंदवाडी रेल्वे गेट क्रमांक 56 जवळ करण्यात आली.
घटनेचा तपशील असा,
आरोपी दत्ता सुनील राऊत (वय 22, रा. मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर, धंदा – ड्रायव्हर) याच्याकडे बाजारू प्लॅस्टिकच्या पिशवीत बेकायदेशीररीत्या ठेवलेला अंदाजे 55 हजार रुपयांचा स्टीलचा रिव्हॉल्वर (देशी कट्टा) मॅगझीनसह सापडला. या रिव्हॉल्वरच्या दोन्ही मुठींना चॉकलेटी रंगाचे फायबरचे आवरण होते. तसेच आरोपीकडून 2 हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे जप्त झाली. काडतुशांवर K F 7.65 असे लिहिलेले आढळले.
सदर शस्त्रास्त्रे आरोपी दत्ता राऊत याच्या ताब्यात परवाना नसताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध भा.ह.का. कलम 3, 25 नुसार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोउपनि राऊत यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
What's Your Reaction?






