अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश...

 0
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश...

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी यांचे आदेश...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीमुळे तलाव ओसंडून वाहत आहे, नद्या ओढ्यांना पूर आलेला आहे. काही घरांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी बोटीने काढले आहेत. म्हणून उद्या जिल्ह्यातील शाळांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, हवामान विभागाने वर्तविलेल्या संभाव्य पावसाची परिस्थिती व आज निर्माण झालेला पुराचा धोका लक्षात घेता, उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

यासंबंधीचा अधिकृत आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

दिलीप स्वामी, आयएएस

जिल्हाधिकारी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow