जिल्हा विद्यूत सल्लागार समिती बैठक, विद्यूत वितरण बळकटीकरणाला वेग द्यावा - खासदार संदीपान भुमरे
जिल्हा विद्युत सल्लागार समिती बैठक
विद्युत वितरण बळकटीकरणाला वेग द्यावा- खा.भुमरे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज):- जिल्ह्यात ग्रामिण भागात विशेषतः शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या वीज वितरणाच्या बळकटीकरणाला वेग द्यावा,असे निर्देश खासदार संदिपान भुमरे यांनी आज दिले.
जिल्हा विद्युत सल्लागार समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, वीणा सावंत, कार्यकारी अभियंता रमेश वाकचौरे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते.
बैठकीत महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल अंतर्गत जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामिण, छत्रपती संभाजीनगर शहर भागातील विद्युत वितरण प्रणालीबाबत चर्चा करण्यात आली. सुधारीत वितरण क्षेत्र पणाली व विद्युत वाहिनी विलगीकरण याबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी अधिक भार असलेल्या ठिकाणी रोहित्र बदलणे, वाढविणे, शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेची योग्य माहिती मिळावी यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच विद्युत हानी कमी करण्यासाठी वाहिन्यांवर उपाययोजना करणे, वाहिन्यांचे विलगीकरण करतांना आवश्यक क्रॉसिंग परवानग्यांसाठी वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग इ. विभागांशी समन्वय साधणे याबाबत माहिती सादर करण्यात आली. तसेच जिल्ह्यात मंजूर झालेल्या 33 केव्ही क्षमतेच्या 34 वीज उपक्रेंद्रांच्या उभारणी कामाचाही आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेली कामे, अंशतः अपूर्ण कामे याबाबत माहिती देण्यात आली.
विद्युत वितरण बळकटीकरणाच्या कामांना जिल्ह्यात गती द्यावी,असे निर्देश खा. भुमरे यांनी यावेळी यंत्रणांना दिले.
What's Your Reaction?