ड्रोन व तत्सम उड्डाणांना शहरात मनाई...!
ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज):- कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये मनाई करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी निर्गमित केला आहे. हे आदेश दि.31 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत लागू राहतील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणाऱ्या कारवाई यास अपवाद असेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?