नवीन नळ कनेक्शन साठी पैसे उकळत असल्याचा उबाठाचा आरोप
नवीन नळ कनेक्शन साठी पैसे उकळत असल्याचा उबाठाचा आरोप
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी काॅन्ट्रक्टरचे कर्मचारी प्रत्येकी साडेचार हजार रुपये उकळत असल्याचा आरोप उबाठाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी केला आहे.
जयभवानी नगर येथील गल्ली नंबर एक मधील नागरीकांकडून नळ जोडणीसाठी पैसे घेतल्याचे कळताच त्यांनी संबंधितांचे पैसे परत मिळवून दिले असल्याची माहिती दिली आहे. सकाळी दहा वाजता याठिकाणी त्यांनी जिवन प्राधिकरणचे अधिकारी सोनवणे, महेश फड यांनी घटनास्थळी शहानिशा केली व ज्यांचे पैसे नळ जोडणीसाठी घेतले असतील ते परत करण्याचे आदेश दिले. राजू वैद्य यांनी शहरातील जनतेला आवाहन केले आहे कोणी नवीन नळ जोडणीसाठी पैशाची मागणी करत असेल तर संपर्क करावे.
What's Your Reaction?