अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ देण्याची मार्टीची मागणी
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या मुदतीत वाढ करण्याची मार्टि कृती समिती महाराष्ट्रची मागणी
परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याबाबत विनंती.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) अल्पसंख्याक समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील सर्वोत्कृष्ट 200 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली होती. अल्पसंख्यांक समुदायातील 75 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी या योजनेचा लाभ मिळणार होता.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या फेरीत 75 पैकी 24 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तथापि, काही तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव, तसेच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अपूर्णता यामुळे अनेक पात्र विद्यार्थी अद्याप अर्ज सादर करू शकले नाहीत.
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे. अर्ज सादर करण्यासाठी आणखी 15-20 दिवसांचा कालावधी उपलब्ध झाल्यास जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
तरी आपण कृपया अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. अशी माहिती मार्टी कृती समितीचे अध्यक्ष एड अजहर पठाण यांनी दिली आहे.
What's Your Reaction?