मनपा प्रशासक जी श्रीकांत यांना एमबीएत सुवर्णपदक...!

 0
मनपा प्रशासक जी श्रीकांत यांना एमबीएत सुवर्णपदक...!

एम बी ए परीक्षेत प्रशासक सुवर्ण पदकाचे मानकरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रथम येण्याचा मान

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज)

प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी एम बी ए परीक्षेत सुवर्ण पदक पटकावून घव घवित यश संपादन केले आहे.

  मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एम बी ए फायनान्स परीक्षेत मा.प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी A++ मानांकन मिळवून सुवर्ण पदक पटकावले आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

 IAS असून सुद्धा शिक्षणाप्रती असलेल्या जिद्दीमुळे त्यांनी एम बी ए करण्याचे ठरवले व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रवेश घेऊन आपल्या दैनंदिन कामकाजामधून वेळ काढून हे घवघवीत यश मिळवले आहे.

शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर न जाता प्रशासनाचा यशस्वी कारभार करताना त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले.

नवीन काही शिकण्याची जिद्दी मुळे त्यांनी एम बी ए फायनान्स परीक्षेत A++ मानांकन मिळवून सुवर्ण पदक पटकावले.

 तसेच उप आयुक्त तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी रविंद्र जोगदंड यांनी सुध्दा एम बी ए फायनान्स परीक्षेत A+ मानांकन मिळवून यश संपादन केले आहे.

आज मनपा मुख्यालय येथे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या तर्फे प्रशासक तथा जी श्रीकांत व रविंद्र जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्या

त आल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow