डॉ.गफ्फार कादरी झाले एक्टिव्ह, महावितरणला दिले निवेदन

 0
डॉ.गफ्फार कादरी झाले एक्टिव्ह, महावितरणला दिले निवेदन

डॉ.गफ्फार कादरी झाले एक्टिव्ह, महावितरणला दिले निवेदन

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी हे लोकसभा निवडणुक संपल्यानंतर शहरात एक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नारेगाव येथे झालेल्या खून प्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. आज शहरात होत असलेल्या विजेच्या लपंडावाच्या समस्येवर महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना मिल काॅर्नर येथील कार्यालयात जाऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करावे या मागणीसाठी निवेदन दिले. दोनदा डॉ.गफ्फार कादरी यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती त्यावेळी थोड्या मताने त्यांचा पराभव झाला. माजी खासदार इम्तियाज जलील यांना पूर्व मतदार संघातून मतांची आघाडी मिळाली होती. या मतदारसंघात मुस्लिम वोट बँक जास्त असल्याने सर्व पक्षांच्या नजरा विधानसभा निवडणुकीत या मतांवर असणार आहे. म्हणून आतापासूनच इच्छूकांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. तिस-यांदा या मतदारसंघातून डॉ.गफ्फार कादरी यांच्यावर एमआयएम विश्वास ठेऊन उमेदवारी देणार की नवीन चेहरा देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पण डॉ.कादरींनी एक्टिव्ह होत निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागले असे यावरुन दिसून येत आहे.

निवेदन देताना एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, औरंगाबाद पूर्वचे अध्यक्ष मीर हिदायत अली, औरंगाबाद मध्यचे अध्यक्ष भाई इम्तियाज खान, जावेद पटेल, अब्दुल रहीम, शेख दस्तगिर, मोहीमीन खान, श्रीमती अंकीता, अक्रम शेख, सोहेल जलील, अजहर पठाण, हाजी अख्तर, युनुस पटेल, आवेज दुर्राणी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow