पहिल्याच दिवशी मनपाच्या शाळेत एडमिशन फुल...!

 0
पहिल्याच दिवशी मनपाच्या शाळेत एडमिशन फुल...!

पहिल्याच दिवशी मनपा शाळेत ऍडमिशन फुल...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.15(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या शाळेत सन 2023 24 मध्ये आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.

 त्या मध्ये विशेष करून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करणे, आम्हाला खेळू द्या, स्मार्ट गुरु ॲप ची निर्मिती, सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम ची स्थापना, कंटेनर लायब्ररी यामुळे महानगरपालिका शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल 5% ने वाढला गेला आहे आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट असल्यामुळे पालकांचा ओढा महानगरपालिका शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी वाढलेला दिसून आला.

   आज शाळेच्या पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या नारेगाव मराठी आणि उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिली मध्ये चार-चार तुकड्यांचे प्रवेश फुल झाले आहेत. मराठी माध्यम मध्ये 139 तर उर्दू माध्यम मध्ये 130 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन इयत्ता पहिली मध्ये झालेले दिसून आलेत. अजूनही पालक शाळेत प्रवेशासाठी मागणी करत आहेत.

      मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा दृष्टिकोन महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून आज शाळेच्या पहिल्या दिवशी महानगरपालिकेच्या 56 शाळेत 56 पालक अधिकारी प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी नियुक्त केले होते.

 स्वतः आयुक्त महानगरपालिकेच्या नारेगाव आणि किराडपुरा नंबर 1 या शाळेमध्ये उपस्थित होते.

 तेथे पालकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आपल्या मुला मुलींना आपण दररोज शाळेत पाठवावे. माझे शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. विद्यार्थ्यांनी प्रथमतः शाळेत खेळायला यावे आम्ही प्रत्येक शाळेत या वर्षी पहिला तास खेळाचा ठेवला आहे आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे हा हेतू असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढताणी दिसत आहे. आणि त्याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी झालेली गर्दी दिसून येत आहे.

   यावेळी अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी, तौसीफ अहमद जनसंपर्क अधिकारी,भारत तीन गोटे शिक्षणाधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी संगीता ताजवे,रईसा बेगम आणि अबरार अहमद मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow