शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत...! ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा प्रवेश
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत...
विद्यार्थ्यांचा ढोल ताशांच्या गजरात शाळेत प्रवेश...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.15(डि-24 न्यूज)
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उल्हास पूर्ण व आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तावाढीसाठी म.न.पा. च्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. उप आयुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली
आज १५ जून शाळेचा पहिला दिवस हा दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनातील संस्मरणीय होण्यासाठी मनपा प्रियदर्शनी विद्यालयात मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून आगळीवेगळी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ढोल लेझीम ताशाच्या गजरात बग्गी मधून मिरवणुकी सहभागी करण्यात आले.
ही मिरवणूक शंभू नगर इंदिरानगर या परिसरातून काढण्यात आली. परिसरातील
सर्व पालकांना हा नावीन्यपूर्ण उपक्रम बघून आश्चर्याचा व आनंदाचा धक्का बसला.
त्यांनी विद्यार्थ्यांना व शाळेला शुभेच्छा दिल्या.
या मिरवणुकीत मनपा प्रियदर्शनी विद्यालयाचे पालक अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी विद्यार्थ्यांना
गुलाब पुष्प मिठाई व पुस्तके देऊन स्वागत केले.
मुख्याध्यापक संजीव सोनार व डॉ. पारस मंडलेचा यांनी पुस्तकांची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.
आज शालेय परिसर व वर्ग फुल पाने केळीचे खांब व फुग्यांनी सजविण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.
तसेच म.न.पा. हर्सूल शाळेत
उपायुक्त अंकुश पांढरे , नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांच्या मार्गदर्शनात प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला.
आज शाळेच्या पहिल्या दिवशी म.न.पा.केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सूलगाव शाळेमध्ये इयत्ता पहिली मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे आनंदाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या पालक अधिकारी मनपा उपायुक्त सविता सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, मिठाई आणि पाठ्यपुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच शाळेच्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमाविषयी माहिती दिली. याप्रसंगी सविता सोनवणे यांनी शाळेच्या सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले . यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य आणि पालक उपस्थित होते.
What's Your Reaction?