आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या हस्ते होनाजीनगरात सामाजिक सभागृहाच्या कामाचे भुमिपुजन

होनाजीनगरात सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - मध्य मतदार संघातील वॉर्ड क्र.5 वानखेडेनगर अंतर्गत होनाजीनगर येथे सामाजिक सभागृहाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गंगाधर ढगे, उपशहरप्रमुख रमेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिरसाठ, शशिकांत पाटील, शुभम गवंडर, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुषमा यादगिरे, शहरप्रमुख संगीता बोरसे, यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक सभागृहामुळे परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले. त्यांनी पुढील काळात मतदार संघात विकासकामांचा वेग वाढवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
What's Your Reaction?






