यशस्वि दहा वर्षे, डाॅ.शोएब हाश्मी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी...

एशियन हॉस्पिटलची आरोग्यसेवेची 10 वर्ष पूर्ण...
विविध मान्यवरांनी दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
125 बेड, 50 डॉक्टर, स्टाफ आणि यंत्रणा रुग्णांसाठी सुसज्ज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 17 (डि-24 न्यूज) - 17 ऑगस्ट 2015 मध्ये छत्रपती संभाजीनगरात डॉ. शोएब हाश्मी आरोग्यसेवेचे व्रत घेऊन एशियन हॉस्पिटलचे रोपटे लावले. रुग्ण आणि नातेवाईक यांचा विश्वास आणि पारदर्शक आरोग्यसेवेच्या या रोपटयाचे 2025 वर्षी वटवृक्षात रूपांतर झाले. 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एशियन हॉस्पिटला विविध मान्यवरांनी दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. एशियन हॉस्पिटल मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शोएब हाश्मी यांनी शुभेच्छा स्वीकारत आभार मानले.
हे हॉस्पिटल रुग्णाचे आधारवड ठरले असून, यापुढे याच वेगाने आरोग्यसेवा पुढे जाईल, यात शंका नाही. 125 बेड, 50 डॉक्टर, 300 स्टाफ आणि यंत्रणा रुग्णांसाठी सुसज्ज असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. शोएब हाश्मी यांनी केले. सदर कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि काही रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना मिळालेल्या उपचार व भावनिक आधाराबद्दल नर्सिंगस्टाफचा आर्वजून उल्लेख केला. यावेळी शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार विलास भुमरे, माजी आमदार एम. एम. शेख, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य, ओसामा अब्दुल कदीर मौलाना, अशफाक मोतीवाला, अतिक मोतीवाला, फारूक पटेल आदीनी उपस्थिती लावली.
What's Your Reaction?






