ऑरेंज व यलो अलर्ट, नागरीकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन...

आँरेज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18, (डि-24 न्यूज) :- भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री महोदय यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूर परिस्थितीचा आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचे योग्य प्रकारे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, पर्यटन स्थळे, धबधबे व गर्दीची ठिकाणे येथे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी व आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, जिल्हाधिकारी यांनी स्थानिक संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शाळांना सुट्टी संदर्भातील निर्णय घ्यावा, स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांमध्ये योग्य सोयी-सुविधा, अन्न व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात आज रोजी 32.30 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून, विभागातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच दि.14-08-2025 पुन 18-08-2025 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त प्राथमिक माहिती नुसार विभागातील एकूण 1004 गावे बाधित झालेली असून 01 व्यक्ती जखमी तर 06 व्यक्ती मयत (हिंगोली-०1,नांदेड-03,बीड-02) झालेल्या आहे.तर एकूण 205 जनावरे मयत(दुधाळ मोठी-69, दुधाळ लहान-102,ओढकाम करणारी मोठी- 28, ओढकाम करणारी लहान-06) झालेली आहे. तर अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण – 486 आहे. शेती पिक नुकसानीच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार एकूण 3,29,509 शेतकरी बाधित झाले असून 2,80,861.02 हे.आर क्षेत्राचे (जिरायत-272507,बागायत-8158, फळपिक-196 हे.आर) नुकसान झाले आहे.
What's Your Reaction?






