शहराचे नाव मीच परत आणू शकतो, समाजात तेढ निर्माण करणारे पक्ष हे करु शकत नाही - हिशाम उस्मानी
शहराचे नाव मीच परत आणू शकतो, समाजात तेढ निर्माण करणारे पक्ष हे करु शकत नाही - हिशाम उस्मानी
जम्मू काश्मीरचे आमदार बशीर वीरी यांचे हिशाम उस्मानी यांना निवडून देण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी शिलाई मशीन समोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा मी विधानसभेत जाऊन ऐतिहासिक औरंगाबादचे नाव परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. जाती धर्माच्या नावावर मते मागणारे पक्षाच्या उमेदवारांपासून सावधान राहावे हे फक्त भाषणे करणारे आहे यांच्याकडे मतदारसंघाचा विकासासाठी व्हिजन नाही तर ते माझ्याकडे आहे. मी प्रामाणिकपणे शहराचे नाव वाचवण्यासाठी न्यायालयात लढा दिला पुढे राजकीय लढा पण देणार आहे यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहे. औरंगजेब रह. हे आमचे हिरो आहे राहणार त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांचा पण मी आदर करतो. फुले शाहू आंबेडकर मौलाना आझाद यांचे आदर्श आमच्या समोर आहे. शहराची ऐतिहासिक ओळख कायम राहावे यासाठी प्रयत्नशील राहणार. जातीपातीचे राजकारण मी करत नाही तर सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन पुढे जात आहे. एक दुस-यांवर आरोप करणारे उमेदवार यांची मिलिभगत आहे ते मी करत नसल्याने अपक्ष म्हणून जनताच माझा पक्ष आणि नेता आहे म्हणून आपले अमुल्य मत देऊन माझ्यासारख्या उच्चशिक्षित उमेदवाराला विधानसभेत पाठवा विरोधी उमेदवार जनहिताचे काम करणारे नाही तर स्वार्थाचे राजकारण करत आहे म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांचा मला प्रतिसाद मिळत आहे असे प्रतिपादन हर्सुल येथे आयोजित जाहीर सभेत मध्यचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार हिशाम उस्मानी यांनी केले.
जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी हिशाम उस्मानी निवडून द्यावे नामांतरासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले. शहराचे नाव परत ते मिळवून देतील असा विश्वास आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करुन मते लाटणा-या पक्षापासून सावधान राहावे. असे आवाहन आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना जम्मू काश्मीरचे आमदार बशीर वीरी यांनी केले. सभेचे आयोजन अॅड अनिस पटेल यांनी केले होते. यावेळी हिशाम उस्मानी व आमदार बशीर वीरी यांचा नागरीकांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात भव्य सत्कार केला.
याप्रसंगी व्यासपीठावर संजय वाघमारे, एड अनिस मजिद पटेल, आवेज पटेल, हाजी सांडू पटेल, रशीद पटेल, मुजीब पटेल, मोईन पटेल, खालिद पटेल, आसिफ पठाण, रियाज पटेल यांची उपस्थिती हो
ती.
What's Your Reaction?