स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मानवी साखळीचे केले आयोजन
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मानवी साखळीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर(डि-24 न्यूज), दि.24 (डि-24 न्यूज) महानगरपालिका व देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या या स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. या द्वारे एकतेचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
राष्टीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाचा नकाशा मानवी साखळी द्वारे साकार केला या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड, राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालिका डॉ. सोनाली क्षीरसागर, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. रवी पाटील, उपप्राचार्या श्रीमती डॉ. अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ. विष्णू पाटील, उपप्राचार्य डॉ. नंदकुमार गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अनंत कणघरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. भाऊसाहेब शिंदे , कार्यक्रम अधिकारी श्रीमती सुवर्णा पाटील, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, इ यांची उपस्थिती होती.
यावेळी 1300 विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा मानवी साखळी द्वारे तयार करण्यात आली. किरण जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता
झाली.
What's Your Reaction?