मराठवाड्यात पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा, नागरीकांनी सतर्कता बाळगावी...

 0
मराठवाड्यात पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा, नागरीकांनी सतर्कता बाळगावी...

मुसळधार पावसाचा इशारा, नागरीकांनी सावधगिरी बाळगावी...

छत्रपता संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) -

महाराष्ट्र व मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरु आहे. काल छत्रपती संभाजीनगर शहर, फुलंब्री, पळशी व आसपासच्या गावाला पावसाने जोरदार बॅटींग केली. ढगफुटी सारखी परिस्थिती आहे. काल रात्री पळशी गावाला पावसाने वेढले होते. प्रशासनाने सतर्कता बाळगत मदतीसाठी सज्ज झाल्याने अनर्थ टळला. 

आज पण हवामान विभागाने पुढील तीन तासांत विजांसह वादळ व ताशी 30-40 किमी वाहणा-या सुसाट वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धुळे, नंदुरबार, नाशिकला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नद्यांना पुर आलेला आहे. शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात सद्यस्थिती 89.34 टक्के (32.563 दलघमी) एवढा उपयुक्त जलसाठा असून प्रकल्पाचा पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात पाण्याचा आवक होत आहे. सध्या प्रकल्पात येणारी आवक पाहता शिवना टाकळी प्रकल्पाची द्वारे कोणत्याही क्षणी उघडण्यात येतील तरी नदीकाठच्या परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तटस्नान, वाहने अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावीत. तसेच नागरीकांना सतर्क राहण्याची सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow