निवडणूक आयोगाने घेतला महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक पूर्व तयारी आढावा

 0
निवडणूक आयोगाने घेतला महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक पूर्व तयारी आढावा

जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक...

निर्भय व पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात _ राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ,दि. 29,(डि-24 न्यूज). राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिकाच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मतदाराला प्राधान्य देऊन मतदान केंद्राची उपलब्धता व सोईसुविधा सज्जतेसह नि :पक्षपाती पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पाडण्याचे नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका व महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीबाबत आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार ,बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची उपस्थिती होती.         

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एक जुलै 2025 रोजीची मतदार यादी अंतिम ग्राह्य धरली जाणार असून याप्रमाणे मतदान केंद्राची संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. मतदाराला सोयीच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून द्यावी याबरोबरच प्रशासनाने मतदान यंत्र, मतमोजणी केंद्र, प्राथमिक सेवा सुविधा यामध्ये मतदान केंद्रामध्ये असणाऱ्या शौचालयाची व्यवस्था, दिव्यांग , महिला यांना सुसह्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त श्री. वाघमारे यांनी उपस्थित सर्व जिल्हाधिकारी यांना दिले.  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण मतदान केंद्रापेक्षा शहरा नजीक असलेल्या ग्रामपंचायत व पंचायतीमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढल्या असल्याने मतदान प्रक्रिया पार पाडताना नवीन मतदान केंद्र निर्माण करून सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मतदाराला नजीकच्या मतदान केंद्रावर मतदान करता येईल तसेच योग्य वेळेत मतदान करणे ही मतदारांना सोयीचे होईल यासाठी सेवा सुविधा उपलब्ध करण्याबाबत केलेल्या पूर्वतयारीचाही सर्व जिल्हा निहाय आढावा घेतला.    

निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी संबंधितांना निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मतदान यंत्र यामध्ये ईव्हीएम आणि बॅलेट युनिट त्याचप्रमाणे याबाबत प्रशिक्षण, साठवणूक याबाबतची सुरक्षा व अतिरिक्त मतदान यंत्र उपलब्ध करण्याबाबतही सूचित करण्यात आले .             

मतदान केंद्राच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यासंदर्भात निवडणूक आयोगामार्फत संबंधित विभागाला सूचना केल्या जाईल. यापूर्वीच्या निवडणुकीत प्रलंबित निधी देण्याबरोबरच लागणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठीच्या खर्चाची मागणी जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त मार्फत निवडणूक आयोगाला कळवावी जेणेकरून निवडणूक प्रक्रिया ही सुसह्य पार पडेल 

बैठकीत सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, उपलब्ध मनुष्यबळ व मतदान केंद्रावरील असणाऱ्या सेवा सुविधा याबाबतचा आढावा मतदान केंद्रांनिहाय तसेच तालुका निहाय दिला. यावेळी मतदान केंद्रात झालेल्या बदलाची नोंद मतदान केंद्रावर असलेल्या विविध सुविधा महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा, निवडणुकीच्या संदर्भात दाखल झालेले आक्षेप व यावरील सुनावणी या संदर्भातही सादरीकरण आयोगासमोर करण्यात आले. 

छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असणाऱ्या पदाबाबतचा आढावा विभागीय आयुक्त यांनी सादर करून आवश्यक असणारा मनुष्यबळाची उपलब्धता करण्यासाठीची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करावी. शक्यतो स्थानिक पातळीवर प्रतिनियुक्तवर गेलेल्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन या संदर्भाची अडचण सोडवण्याबाबतची निर्देश विभागाचे सचिव सुरेश काकांनी यांनी दिले.

आगामी निवडणुकीसाठी शहरी भागात नगरपंचायत व नगरपालिकेमध्ये मतदारांची संख्या वाढली असल्याने या भागातील मतदान केंद्राची संख्या ही त्यानुसार बदल करून सेवा सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करण्यात यावे व निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे तिथे स्थानिक पातळीवरून विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसह बदल करण्याचेही सूचित करण्यात आले. मतदारांना निर्भय , निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडल्याचे समाधान व्हावे यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी जबाबदारीने कामकाज करावे. मतदार हा प्रमुख घटक असून मतदारांच्या सर्व सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचेही सूचित करण्यात आले.

 यावेळी संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पूर्वतयारीबाबत आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील पाचही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोईसुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खाजगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. 

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना उपस्थित होते.

 

निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 26 जून, 2025 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक केलेल्या सोईसुविधांचा आढावा घेऊन सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांनी माहिती दिली.

निवडणूक आयुक्त श्री.वाघमारे म्हणाले की, मतदार यादी तयार करणे हेच या निवडणुकीतील महत्वाचे काम आहे. त्या प्रभागातील मतदार त्याच प्रभागात मतदान करतील याकडे मतदार यादीचे विभाजन करताना कटाक्षाने लक्ष द्यावे. महानगरपालिकांना आवश्यक ईव्हीएमची उपलब्धता करून देण्यात येणार असून साठवणूकीची जागा आणि वापरलेले ईव्हीएम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. निवडणुकीच्या अनुषंगाने वेबसाईट व ॲप अद्ययावत करण्यात आले असून या दोन्हीचा वापर करता येईल. या ॲपचा व वेबसाईचा सर्वसाधारण मतदारालाही वापर करता येणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली. 

यावेळी निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow