हिशाम उस्मानी मध्य मधून भरणार अपक्ष उमेदवारी, कोणाला ठरणार डोकेदुखी...!

हिशाम उस्मानी मध्य मधून भरणार अपक्ष उमेदवारी, कोणाला ठरणार डोकेदुखी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)
107-औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्ते तथा समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी आज अर्ज घेतला आहे. ते अपक्ष म्हणून या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. त्यांनी काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे तर नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते चर्चेत आले होते. सामाजिक व धार्मिक कार्यात ते नेहमी सक्रीय असतात. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर कोणाला डोकेदुखी ठरणार येणारा काळच ठरवेल. त्यांनी दावा केला आहे की विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांना स्विकारतील.
What's Your Reaction?






