शांततेत ईद साजरी करत सामाजिक सलोखा राखावा- पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया
शांततेत ईद साजरी करत सामाजिक सलोखा राखावा- पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.16(डि-24 न्यूज) उद्या देशात व जगभरात ईद-उल-अजहा(बकरी ईद) साजरी होणार आहे. शहर आणि जिल्ह्यात ईदची विशेष नमाज अदा केली जाते यानंतर कुर्बानी केली जाते. या सणानिमित्त पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा संदेश देत शांततेत ईद साजरी करत सामाजिक सौहार्द कायम राहील यासाठी प्रयत्न करावे. कुर्बानी करताना स्वच्छता राखावी. ईदनिमित्त जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करु नये. सायबर क्राईमची नजर सोशल मीडियावर असणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असे आवाहन कलवानिया यांनी केले आहे.
What's Your Reaction?