गुलमंडी पार्कींग मधील पोल, डीपी स्थलांतरित करण्याचे प्रशासकांचे निर्देश
गुलमंडी पार्किंग मधील पोल, डीपी स्थलांतरित करण्याचे प्रशासकांचे निर्देश...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.16(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी गुलमंडी भागाची पाहणी केली. या ठिकाणी सुदर्शन मेडिकल समोरील दोन विद्युत पोल मागे घेणे तसेच जवळ असलेली एक धोकादायक इमारत पाडणे आणि मराठा हॉटेल जवळ डीपी स्थलांतरित करणे संदर्भात नागरिकांची मागणी होती.
या सर्व बाबींची आज स्थळ पाहणी करून प्रशासकांनी नियोजन करून पोल आणि डीपी हटविण्याचे निर्देश दिले. याशिवाय धोकादायक इमारतींबाबत महापालिकेचे धोरण आणि सुरू असलेली कारवाई बाबत नागरिकांना सांगितले. प्रशासक म्हणाले की महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आलेली आहे. बेगमपुरा आणि जुना मोंढा या भागात दोन धोकादायक इमारती पाडण्यात पण आलेले आहेत. ही कारवाई यापुढे पण सुरू राहील, यावेळी ते म्हणाले. यावेळी कार्यकारी अभियंता विद्युत फारुख खान, उप अभियंता विद्युत विभाग मोहिनी गायकवाड, इमारत निरीक्षक मजहर अली इत्यादींची उपस्थिती हो
ती.
What's Your Reaction?