पहील्याच दिवशी अतुल सावे यांच्या मतदारसंघातून सर्वात जास्त इच्छूकांनी घेतले अर्ज...!
पहील्याच दिवशी 435 अर्ज घेतले एक उमेदवारी अर्ज दाखल...!
विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघातून सर्वात जास्त इच्छूकांनी घेतले अर्ज....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 साठी जिल्ह्यातील 9 मतदारसंघातून आज पहील्याच दिवशी 435 अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले आहे तर एकमेव उमेदवारी अर्ज 111- गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब तात्याराव लगड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आज 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहे.
सर्वात जास्त अर्ज 109-औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून गेले आहे. 53 जणांनी 110 अर्ज घेतले आहे. सर्वात कमी अर्ज 112-वैजापूर मतदारसंघातून 10 जणांनी 19 अर्ज घेतले. 104-सिल्लोड मतदारसंघातून 22 जणांनी 57 अर्ज, 105-कन्नड मतदारसंघातून 35 जणांनी 84, 106-फुलंब्री 26 जणांनी 60, 107-औरंगाबाद मध्य 31 जणांनी 67, 108-औरंगाबाद पश्चिम 28 जणांनी 57, 110-पैठण 30 जणांनी 60, 111-गंगापूर 33 जणांनी 73 अर्ज घेतले आहे.
What's Your Reaction?