परिमल प्रकाशनचे संस्थापक अनंत दाशरथे यांचे निधन...
परिमल प्रकाशनचे संस्थापक
अनंत दाशरथे यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) -: परिमल प्रकाशनचे संस्थापक अनंत बाजीराव दाशरथे , वय 88 वर्षे रा. खडकेश्वर यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री 10.45 वाजता निधन झाले. त्यांच्यावर पुष्पनगरी स्मशान भूमीत बुधवारी (ता. 30) दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मराठवाडा बुक डिस्टिब्युटरच्या माध्यमातून त्यांनी देशभर पुस्तक वितरणाचे जाळे विस्तारले होते. साहित्य क्षेत्रातील दिग्गज लेखक, साहित्यिक यांच्याशी त्यांचा स्नेह होता. परिमल प्रकाशनाने दर्जेदार साहित्य पुस्तके प्रकाशित केली. वाचकांनी परिमल प्रकाशनाच्या पुस्तकांना उदंड प्रतिसादही दिला. त्यांच्या पश्चात 2 मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. सुहास दाशरथे आणि नितीन दाशरथे यांचे ते वडील होत.
What's Your Reaction?