अखेर बीडचे पालकमंत्री पद अजितदादांकडे, छत्रपती संभाजीनगरचे संजय सिरसाट, अतुल सावे यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्री पद

 0
अखेर बीडचे पालकमंत्री पद अजितदादांकडे, छत्रपती संभाजीनगरचे संजय सिरसाट, अतुल सावे यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्री पद

अखेर बीडचे पालकमंत्री पद अजितदादांकडे, छत्रपती संभाजीनगरचे संजय सिरसाट, अतुल सावे यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्री पद

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) बीडचे पालकमंत्री पद व छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) चे पालकमंत्री पद कोणाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बीड व पुण्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद विरोध असल्याने दिले नाही असे आज स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्री पद दिले आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) चे पालकमंत्री पद अखेर सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्याकडे तर नांदेडचे पालकमंत्रीपद अतुल सावे यांना दिले आहे. जालना पंकजा मुंडे, परभणी श्रीमती मेघना बोर्डीकर, हिंगोली नरहरी झिरवळ, धाराशिव(उस्मानाबाद) प्रताप सरनाईक, लातूर शिवेंद्रसिंहराजे भोसले, नागपूर, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर(अहमदनगर) राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम हसन मुश्रीफ, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार, सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, चंद्रपूर डॉ.अशोक उईके, सातारा शंभुराज देसाई, रायगड कु.आदिती तटकरे, नंदुरबार अॅड माणिकराव कोकाटे, सोलापूर जयकुमार गोरे, भंडारा संजय सावकारे, बुलढाणा मकरंद जाधव(पाटील), सिंधुदुर्ग निलेश राणे, अकोला आकाश फुंडकर, गोंदीया बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, सह पालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, गडचिरोली सह पालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल, वर्धा डॉ.पंकज भोयर यांची पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow