हुमायुने पुन्हा पटकावला सुवर्णपदक, बिडकीनची यशाची परंपरा कायम
हुमायुने पुन्हा पटकावला सुवर्णपदक, बिडकीनची यशाची परंपरा कायम
बिडकीन, दि.19(डि-24 न्यूज) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आयोजित महाराष्ट्र लेवल स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत बिडकीनचा उदयोन्मुख तायक्वांदो खेळाडू हुमायू हाफिज इम्रान याने विजयाची परंपरा कायम राखत या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. पुण्याच्या खेळाडुला हरवून त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अर्श सुफीयान कुरेशी, उस्मानाबाद यालाही हुमायुने हरवले. याप्रसंगी इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान यांना म्हाडाचे आमदार जीत पाटील यांच्या हस्ते 52 वा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी अगोदर तायक्वांदोत 21 पुरस्कार प्राप्त केले आहे. देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावून या खेळात नवीन खेळाडू तयार करण्यासाठी ते झटत आहेत. हुमायु व हाफिज इम्रान यांचे बिडकीन व सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
.
What's Your Reaction?