जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने दहिहंडी स्पर्धेत गोविंदांचा थरार, उद्या ढोल वादन स्पर्धा

जिल्हा श्री गणेश महासंघाच्या दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांचा थरार
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे उत्कंठा वाढविणारे एकावर एक थर... पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे प्रत्येक क्षण... आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला शहरातील विविध गोविंदा पथकांनी स्वाभिमानी मानाची सलामी यंदा दिमाखदार सोहळ्यात संभाजी पेठेतील जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी (दि.13) दिली.
शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धेचे उदघाटन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दहीहंडी स्पर्धेची पाहिली सलामी श्री संस्थान गणपती गोविंदा पथकाने दिली. या सोहळ्याची गोविंदा पथकात असलेली उत्सुकता शिगेला पोहोचलेली यावेळी दिसून आली. दहीहंडी स्पर्धेचे परीक्षण विकास सूर्यवंशी यांनी केले. पंच म्हणून विशाल काकडे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्रीचे संचालक सय्यद अझहर, गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष किशोर तुळशीबागवाले, सुरेश टाक, रमेश तुळशी बागवाले, चंद्रकांत जोजारे, शिवसेना उपशहर प्रमुख युवराज वाकेकर,शिवसेना शहर प्रमुख संगीता बोरसे, उप शहर प्रमुख संगीता सरवदे, उप शहर प्रमुख, लता त्रिवेदी, उपविभागप्रमुख ऍड सुनीता रिंढे, उपविभाग प्रमुख नंदा खिल्लारे, उपविभाग प्रमुख रवींद्र रिंढे, नितेश टेकाळे, युवा सेना पश्चिम तालुका प्रमुख राजेश कसुरे, यांची उपस्थिती होती. प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, चंद्रकांत इंगळे, निखिल चव्हाण, विनायक वेंन्नम, मयूर जाधव, राजू मन्सूरी, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संजय राखूडें, सुमित दंडुके, अनिल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
या गोविंदा पथकांनी नोंदविला सहभाग...
श्री संस्थान गणपती गोविंदा पथक, जागृत हनुमान गोविंदा पथक, शिवसेना गोविंदा पथक, हर्षनगर गोविंदा पथक, संगत गोविंदा पथक, जबरे हनुमान गोविंदा पथक, उत्तर मुखी गोविंदा पथक, कालभैरव गोविंदा पथक बाळकृष्ण गोविंदा पथक, संत रोहिदास गोविंदा पथक, कृष्ण केसरी गोविंदा पथक, हिंद सूर्य गोविंदा पथक, धर्मसंग्राम गोविंदा पथक, हितोपद्देश गोविंदा पथक यांनी या दहीहंडी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून सलामी दिली.
उद्या भव्य ढोल वादन स्पर्धा...
शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने आज शनिवार (दि. 14) रोजी संभाजी पेठेतील जिल्हा परिषद मैदानावर महाराष्ट्राची सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य धुरंधर, अविस्मरणीय अशा ढोल वादन स्पर्धेचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या ढोल स्पर्धेतील विजेत्या ढोल पथकांना प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे 51 हजार, 31 हजार, 21 हजार पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजय राखुंडे पाटील मो.9970593939, निखिल चव्हाण पाटील, मो.9403362007 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल जैस्वाल
यांनी केले आहे.
What's Your Reaction?






