सर्व रोग निदान शिबिर व तपासणी शिबिर संपन्न...!

 0
सर्व रोग निदान शिबिर व तपासणी शिबिर संपन्न...!

सर्व रोग निदान शिबिर व तपासणी शिबिर संपन्न...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)

जय तुळजाभवानी गणेश मंडळ एस. टी. कॉलनी N-2 सिडको व सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्री महारुद्र हनुमान मंदिर सभागृह एस. टी. कॉलनी येथे आयोजित करण्यात आले. या प्रसंगी अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना, भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील खोचे, एस.टी. कॉलनी सोसायटी अध्यक्ष देवनाथ जाधव, सचिव अशोक नवपुते, डायरेक्टर अशोक अंबुलगेकर, डायरेक्टर रमाकांत निकम, शरदचंद्र पाटील, हुंबे काका, पुंडलीक खंडगावकर आदि उपस्थित होते. हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी जय तुळजाभवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्वेश खोचे, उपाध्यक्ष गोपाळ आवारे, सचिव ऋषिकेश शिनगारे, कोषाध्यक्ष विश्वजित देशमुख, सदस्य अजय डावकर, कुंदन बेंद्रे, अभिषेक शिनगारे, सोहम गजमल, सौरभ पाटील, सुमित बिंदू, शंतनु निकम, प्रितम डांबे, हर्ष महामुने, क्षितिज हिवाळे पाटील, ओम पवार, यांनी विषेश परिश्रम घेतले. तसेच सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल तर्फे तपासणी शिबिरास डॉ रंगनाथ काळे, डॉ पंकज तायडे, डॉ रोहिणी साळवे, लॅब टेक्निशियन आदित्य राजपूत, ECG टेक्निशियन योगेश मतसागर व हर्षद देशमुख यांनी तपासणी केली या शिबिरात 70 ते 75 नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तसेच रविवार दिनांक 15/9/2024 रोजी महाप्रसाद (भंडारा) जय तुळजाभवानी गणेश मंडळाच्या वतीने होणार असून सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow