21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या डोमाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महत्वाचे ठराव मांडणार - बादशहा पटेल

डोमाच्या राष्ट्रीय अधिवेशनात शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ठराव मंजूर होणार - बादशहा पटेल
दलित ओबीसी मायनॉरिटी आदिवासी संघटनेच्या आढावा बैठकीत निर्णय...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- दलित ओबीसी मायनॉरिटी आदिवासी परिसंघ संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन 21 सप्टेंबर रोजी शहरात होणार आहे. या अधिवेशनामध्ये शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार, सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नाचे ठराव पारित करून ते शासन दरबारी पाठवण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.
दलित-ओबीसी-मायनॉरिटी आदिवासी परिसंघ संघटनेची बैठक आज शनिवारी जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बेरीबाग येथील संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी सिडकोतील गुलाब विश्व हॉल येथे डोमाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार उदित राज यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचा तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या. ओबीसी आरक्षणामध्ये अनुच्छेद 340 ची प्रक्रिया करुनच समावेश करावा, कामगारांचे कामाचे तास 12 तासावरून आठ तास करावे, सर्वत्र विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती केली जात आहे ती बंद करावी, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये, महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी, 1975 पासून कसत असलेल्या आदिवासींच्या जमिनी कायम कराव्यात, अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत बेघर झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मोबदला द्यावा किंवा त्यांना पर्यायी घरे द्यावी, उच्च न्यायालयाने मुस्लिमांसाठी मंजूर केलेले 5 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करावी, गायरान जमिनीवरील सर्व सामान्याचे अतिक्रमण हटवू नये ती अतिक्रमणे नियमाकुल करावीत आदी ज्वलंत प्रश्नावर राष्ट्रीय अधिवेशनात ठराव पारित केले जाणार आहे. हे ठराव अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बादशहा पटेल यांनी दिली. त्यांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बैठकीला कडुबा साळवे, एड नवाब पटेल, शेख युसूफ मौलाना, एड सतीश सोनवणे, साजिद पटेल, आनंदा डोखे, शेख हबीब नजीब, परमेश्वर खोपे, शेख चांद, शेरु खान, दादाराव मोकळे, गौतम प्रधान, भानुदास मते, पंडित डोंगरे, सय्यद माजेद, राजु पडवळ आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






