पवित्र हज यात्रा-2025 साठी जिल्ह्यातील 1366 यात्रेकरू ठरले लकी
पवित्र हज-2025 यात्रेसाठी 1366 यात्रेकरू ठरले लकी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) पवित्र हज यात्रा-2025 साठी जिल्ह्यातील 1366 यात्रेकरू लकी ठरले आहे. आज दिल्ली येथील सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडियाच्या शाखा कार्यालयात सकाळी 11.30 वाजता हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी सोडत काढण्यात आली. महाराष्ट्रातून एकूण 23395 अर्ज आले होते. राज्याचा कोटा आहे 9165 होता. यावर्षी काही राज्यातून कमी अर्ज आल्याने अधिक जागा मिळाल्या. एकूण 17397 यात्रेकरूंची निवड महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. 5998 यात्रेकरु प्रतिक्षा यादीत आहे. अशी माहिती सेंट्रल हज कमेटीने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथून 1817 अर्ज आले होते (65+ 238, General category 1577), Ladies without Mehram 2 अर्ज आले होते. 65+ व लेडीज without Mehram 2 असे एकूण 240 जागा निघाल्यानंतर जनरल कॅटेगरीच्या 1577 जागांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. कोट्यानूसार 1126 जागांची निवड करण्यात आली. उर्वरित 451 प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आले.
फेडरेशन ऑफ हज पिलग्रिम्स सोशल वर्कर्सचे जनरल सेक्रेटरी शेख फैसल यांनी हि माहिती दिली आहे. खिदमात-ए-हुज्जाज कमेटीचे सचिव मिर्झा अफसर अली बेग यांनी सांगितले हज कमिटी ऑफ इंडियाच्या सिईओच्या म्हणण्यानुसार तात्पूरते हाजींना पहेला हप्ता 1 लाख 30 हजार 300 रुपये 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरावे लागेल. हि रक्कम ऑनलाईन भरता येईल. त्यासोबतच पूर्ण भरलेला अर्ज, अंडरटेकींग, मेडीकल स्क्रीनिंग प्रमाणपत्र, पासपोर्टची झेरॉक्स, पेमेंटची पावती. पासपोर्ट डिक्लरेशन फाॅर्म महाराष्ट्र राज्य हज कमिटी मुंबई येथे 23 ऑक्टोबर पर्यंत पाठवावे लागेल.
खिदमात-ए-हुज्जाज कमेटीचे उपाध्यक्ष सय्यद अजिज कुरेशी, सय्यद अर्शद इंजिनिअर यांनी हजसाठी योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळवण्यासाठी कार्यालय पटेल आर्केड, जुना बाजार येथे संपर्क साधावा. सोशलमिडीयावर हज यात्रेशी संबंधित फेक माहितीपासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?