बिडकीनच्या खेळाडूंचा तायक्वांदो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका...

 0
बिडकीनच्या खेळाडूंचा तायक्वांदो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका...

बिडकीनच्या खेळाडूंचा तायक्वांदो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) बिडकीनच्या तायक्वांदो खेळाडूंनी हैदराबाद येथे सुरू असलेल्या 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान ओपन एशियन इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप-2025 स्पर्धेत इंटरनॅशनल कोच डॉ.हाफिज इम्रान यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले.

या स्पर्धेत परफेक्ट मार्शल आर्ट्स टिमने पहील्याच प्रवेशात शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 2 रोप्य पदक पटकावून महाराष्ट्राला नावलौकिक मिळवून दिला. या यशाबद्दल बिडकीन व छत्रपती संभाजीनगर येथील खेळाडूंनी अभिनंदन केले.

हि स्पर्धा तायक्वांदो मास्टर वफा रवी(बंगळूरु) यांच्या आयोजनाखाली पार पडली. भारत, मलेशिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कतार या 8 देशांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

हुमायून डॉ.हाफिज इम्रान याला सुवर्ण पदक, सार्थक कृष्णा राठोड सुवर्ण पदक, अर्श अनीस शेख सुवर्ण पदक, फैजान मुजंमील तंबोली रौप्य पदक, अर्श सुफयान कुरेशीला रौप्य पदक मिळाले आहे. स्पर्धेत सर्वोत्तम प्रशिक्षकाचा मान मास्टर हाफिज इम्रान यांना मिळाला. या संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow