छावणीच्या बाजारात गर्दी, कुर्बानीचे बोकूड स्वस्त...!

 0
छावणीच्या बाजारात गर्दी, कुर्बानीचे बोकूड स्वस्त...!

छावणीच्या बाजारात गर्दी, कुर्बानीचे बोकूड स्वस्त...!

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध छावणीच्या बाजारात आज कुर्बानीसाठी बोकूड खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. यावर्षी जास्त दर नसल्याने खरेदीदारांची गर्दी होती. 10 हजारांपासून 51 हजारांपर्यंत सुंदर व देखने बोकूड विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी घेऊन आले होते. जमना परी, हैदराबादी व गावरान बोकूड विक्रीसाठी आले होते. शहर व जिल्ह्यातील लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दाखला असला तरच खरेदीदारांना बोकूड बाहेर आणता येईल असा नियम आहे. 17 जून रोजी देशभरात इद-उल-अजहा(बकरी ईद) साजरी होणार असल्याने मुस्लिम समुदायाने कुर्बानीचा बोकूड खरेदी केले. शहरातील कटकट गेट, नेहरुनगर, चंपाचौक, शाहबजार व विविध ठिकाणी बोकूड विक्रीसाठी उपलब्ध आहेत

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow