आता उपोषण नाही, आंदोलन सुरुच राहणार, शहागड येथे मोठे कार्यालय उभारणार असल्याची मनोज जरांगेंची घोषणा...!
आता उपोषण नाही, आंदोलन सुरूच राहणार, शहागड येथे मोठे कार्यालय उभारणार असल्याची मनोज जरांगेंची घोषणा
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) आता तब्येत बरी राहत नाही, चालायला येत नाही, कमजोरी वाढली. सरकारने सगेसोय-याचे टिकणारे आरक्षण एका महीन्यात देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण सोडले. सरकारने दगा दिला तर विधानसभा निवडणुकीत समाज धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटीची सरकारने घोषणा केली त्यावेळी जे सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार टेबल वाजवत होते ते भेटायला आले नाही ज्यांनी टेबल वाजवला नाही ते येत आहे. आठ दिवसांनंतर रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर गांव शहागड येथे जाणार आहे. तेथे आजपासुन एकरात मोठे कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंतरवाली सराटीत आंदोलन स्थळ राहणार आहे परंतु भेटण्यासाठी तेथे गर्दी होत असल्याने कार्यालय आता शहागड येथे असणार आहे. आंतरवाली येथील नागरिकांनी फार साथ दिली. दहा महीने तेथे आंदोलन सुरू होते. गावकऱ्यांनी अनमोल सहकार्य केले. आता तब्येत बरी नसल्याने उपोषण नको. न्याय मिळेपर्यंत डोंगरावर का होईना तब्येत बरी झाल्यावर आंदोलन उपोषण करु. मराठा आरक्षणाची लढाई मोठी आहे मुस्लिम धनगर आरक्षणाचाही लढा उभारणार आहे. उपचारानंतर मराठा समाजाच्या बैठक सुरू करणार आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर कोणाला विधानसभा निवडणुकीत पाडायचे तो निर्णय घेणार आहे. सर्व जाती धर्मातील उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे करायचे की नाही समाज ठरवणार आहे.
संघर्ष योध्दा चित्रपट आज प्रदर्शित होत असल्याने जरांगेंनी शुभेच्छा दिल्या. पण मी चित्रपट बघत नाही.
आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार आहे त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. सरकारला एक महीन्याचा वेळ दिला आहे. आश्वासन नाही दिले दगाफटका होऊ देऊ नका गरीबांचे मुलं मोठे झाली पाहिजे.
एसआयटी रद्द करणार आहे पण तारीख संपली आहे पुढे करणार आहे. शब्द तसे होत मला राजकारणात जायचे नाही. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरू केला आहे.
आम्ही ठाम आहे आता धोका बसला तर हा समाजाला मोठा धोका असणार आहे. विधानसभा लढणार कि नाही निर्णयावर अवलंबून आहे.
आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आता कोण राहिले विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सर्व ओबीसीत गेले जर ओबीसी मधून आरक्षण मिळाले नाही तर कोणाला पाडायचे कोणाला निवडून आणायचे ठरवू.
समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे. कोणीही द्यावे पण आम्हाला आरक्षण द्यावे सरकार कोणाचेही असो आरक्षण हवे.
मी दहा महीन्यात पासून बोलत आहे जे बोललो ते खरं कोणी काही घेतले तर सांगा. मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितले की मुंबईत बैठक आहे. त्यानंतर जोमाने कामाला लागणार आहे. आरक्षणाशिवाय सुट्टी नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.
आंतरवाली सराटी सोडणार नाही तेथील नागरिकांना गाडयामुळे शेतकऱ्यांना त्रास नको म्हणून शहागड येथे कार्यालय थाटणार आहे. मोकळे मैदान हवे म्हणून तेथे कार्यालयाचे आजपासून काम सुरू केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वार रुम केल्याशिवाय जमणार नाही. आंतरवालीची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. आता उपोषण नाही मला चालता येत नाही उठता येत नाही 19 वर्षांपासून समाजासाठी लढा दिला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
What's Your Reaction?