इम्तियाज जलील यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे ओवेसींचे आदेश
 
                                इम्तियाज जलील यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे ओवेसींचे आदेश
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश एमआयएमचे सुप्रीमो बॅ.असदोद्दीन ओवेसींनी इम्तियाज जलील यांना दिले आहे. शनिवारी शहराच्या दौ-यावर आले असताना राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ओवेसींनी बैठक घेऊन आढावा घेतला. यामध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा, औरंगाबाद पूर्व विधानसभा, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला. इम्तियाज जलील यांच्या पराभवाने दु:ख झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तरीही राजकारणात जय पराजय होत असतो जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मैदान सोडायचे नाही विधानसभेची तयारी करा असे आदेश त्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु कोणत्या मतदारसंघातून तयारीला लागा हे कळू शकले नाही. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून डॉ.गफ्फार कादरी यांनी तयारी सुरू केली आहे तर मध्य मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढण्यास तयार असल्याचे नासेर सिद्दीकी यांनी म्हटले आहे तर माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर हे सुद्धा इच्छुक आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल पक्षाचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी निर्णय घेतीलच.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            