रेल्वेत एकाच दिवशी 1202 विनातिकीट प्रवासी पकडले, 4.9 लाख दंड वसूल...

 0
रेल्वेत एकाच दिवशी 1202 विनातिकीट प्रवासी पकडले, 4.9 लाख दंड वसूल...

रेल्वेत एकाच दिवशी 1202 विनातिकीट प्रवासी पकडले, 4.9 लाख दंड वसूल....                                                       

 एकाच दिवशी 1202 विनातिकीट प्रवासी पकडले – ₹ 4.9 लाख दंड वसूल

नांदेड, दि.8(डि-24 न्यूज)-

नांदेड विभागात 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 5.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकाच दिवशी 1202 विनातिकीट / अनियमित प्रवासी तसेच अनबुक्ड सामानासह प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही 1 मे 2025 नंतरची सर्वाधिक एकदिवसीय कारवाई ठरली असून, एकूण ₹4.9 लाख दंड व तिकीट रक्कम वसूल करण्यात आली.

या मोहिमेत मनमाड–औरंगाबाद, परभणी–परळी, परभणी-नांदेड, आदिलाबाद–मुदखेड आणि पूर्णा–अकोला या मार्गांवरील अनेक एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली.

एकूण 21 गाड्यांची तपासणी करण्यात आली. प्रमुख गाड्यांमध्ये सचखंड एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, बेंगळुरू एक्सप्रेस, नांदिग्राम एक्सप्रेस, पनवेल एक्सप्रेस, यशवंतपूर एक्सप्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, नर–काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, संबलपूर एक्सप्रेस तसेच पूर्णा–आदिलाबाद, पूर्णा–अकोला आणि नरसापूर–नगरसोल–चेन्नई एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांचा समावेश आहे.

ही मोहीम श्री एन. सुब्बाराव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. जे. विजय कृष्ण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, श्री रितेश कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्रीमती इती पांडे, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे आणि श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आली.

या मोहिमेत 32 तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या तपासणी मोहिमेचा उद्देश विनातिकीट प्रवासावर अंकुश ठेवणे, प्रवाशांमध्ये नैतिक भीती निर्माण करणे आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.

रेल्वेचा प्रवाशांना आवाहन

नांदेड विभागाकडून सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, नेहमी वैध तिकिटासह प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी. अशा तीव्र तपासणी मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येतील, ज्यामुळे प्रामाणिक प्रवाशांना अधिक सुविधा आणि सुरक्षितता मिळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow