मोकाट कुत्र्यांनी 3 वर्षाच्या अरमानचा घेतला जीव, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण करण्याची मागणी...!

मोकाट कुत्र्यांनी 3 वर्षाच्या अरमानचा घेतला जीव, शहरात भीतीचे वातावरण...!
मनपा प्रशासनाच्या विरोधात संताप... मोकाट कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत आहे. जुना मोंढा, जाफर गेट परिसरात 3 शेख अरमान शेख आमीर या चिमुकल्यावर 8 दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आज घाटी रुग्णालयात त्याची प्राणज्योत मावळली. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
या घटनेची हकीकत अशी की या चिमुकल्याला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला परंतु त्याच्या शरीरावर जखमा नसल्याने कुटुंबाने गंभीरतेने घेतले नाही परंतु त्याच्या डोक्यात केसांमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याचे आढळले. एका खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखवली. अरमानला पाण्याची भीती वाटू लागली. अंगावर खाज सुरु झाली. डाॅक्टरांनी घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला परंतु डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले उपचारासाठी उशिर झाला आहे. एडमिट केले तरीही जीव वाचेल का यात शंका आहे. विष शरीरात पसरल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवळी. त्याला अगोदर रेबीज इंजेक्शन दिले असते तर जीव वाचला असता. अरमानच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घाटी रुग्णालयात संपर्कात असलेल्या सर्व सदस्यांना रेबीज इंजेक्शन देण्यात आले. अरमानचे वडील आमिर शेख यांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली आहे माझ्या मुलांसोबत जे घडले कोणाच्या मुलांसोबत घडू नये म्हणून मोकाट कुत्र्यांचासून पालकांनी सावध राहावे. महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना शहराबाहेर हलवावे नसता निष्पाप वादकांना जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो.
What's Your Reaction?






