वक्फ बोर्डाच्या चेअरमन विरोधात एसडिपिआय अक्रामक, वक्फ बोर्डाच्या कार्यालयासमोर केले आंदोलन...

महाराष्ट्र वक्फ बोर्ड मध्ये होत असलेल्या गैरकारभार व भ्रष्टाचारा विरुद्ध SDPI आक्रमक...
प्रदेशाध्यक्ष अजहर तांबोळी यांच्या विरोधात मानहानीचा खटला वक्फ बोर्डाच्या चेअरमन यांनी दाखल केल्याने एसडिपिआय अक्रामक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- 20 सप्टेंबर रोजी, औरंगाबाद येथे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष अजहर तांबोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्फ बोर्ड व मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पुराव्यासहित खुलासा केला होता.
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांच्यावर यापूर्वीही व बोर्डाच्या मालमत्तेमध्ये भ्रष्टाचार करण्याचे अनेक आरोप आहेत. पत्रकार परिषदेमध्ये सबळ पुरावा देऊनही , मटका चालवण्यासाठी कर्ज प्राप्तीसाठी अवैध व बेकायदेशीररित्या वक्फच्या जमिनी गहाण ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल न करता, चौकशीच्या नावावर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याचे काम व बोर्डाचे चेअरमन समीर काझी करत आहेत. महाराष्ट्र वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात गैर कारभार व भ्रष्टाचार चालत आहे. या सर्व गैर कारभारामुळे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने वक्फ बोर्ड मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या कार्यालयासमोर विरोध प्रदर्शन केला . यावेळी SDPI कडून , खालील मागण्या करण्यात आल्या
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या व वक्फ मालमत्तेची सुरक्षा करण्यास असक्षम असलेल्या बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
अवैध, बेकायदेशीर पद्धतीने मटका चालवण्यासाठी कर्ज प्राप्तीसाठी वक्फ जमीन तारण म्हणून ठेवणाऱ्या व इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यां विरुद्ध त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावा.
वक्फचे चेअरमन समीर काझी यांनी केलेल्या भ्रष्टाचारांची चौकशी स्वतंत्र SIT स्थापन करून त्वरित करण्यात यावी.
वक्फ बोर्डामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास SDPI राज्यस्तरीय तीव्र आंदोलन करेल असे प्रदेश महासचिव सय्यद कलीम यांनी सांगितले.
समीर शाह जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव अब्दुल अलीम, मोहसिन खान, जिल्हा कोषाध्यक्ष हाफिज समीउल्लाह काजी,
जिल्हा सदस्य जबीन शेख, अशरफ पठान आरेफर श उमर मिर्ज़ा, साजिद पटेल, हफीज़ अबुज़र पटेल पूर्व विधानसभा अध्यक्ष, रियाज़ सौदागर फूलंबरी विधानसभा अध्यक्ष, हसीना कौसर सचिव, फरहान शेख, शेख समीर, सलमान शेख, सोहेल पठान, शफीउद्दीन शेख, पार्टीचे पदाधिकारी व सदस्य मोठे संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






