भयान वर्तमानात देश व संविधान वाचवण्यासाठी निघालेली ही यात्रा आयटकचे महत्वाचे पाऊल - डॉ.कल्याण काळे

 0
भयान वर्तमानात देश व संविधान वाचवण्यासाठी निघालेली ही यात्रा आयटकचे महत्वाचे पाऊल - डॉ.कल्याण काळे

आयटकच्या महासंघर्ष यात्रेनिमित्त मोटार सायकल रॅली व जाहीर सभा....

भयान वर्तमानात देश व संविधान वाचवण्यासाठी निघालेली ही यात्रा हे आयटकचे महत्वाचे पाऊल -डॉ.कल्याण काळे

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) भयान, भय-द्वेष‌ व‌ दहशतीच्या वर्तमानात देश, संविधान वाचवण्यासाठी निघालेली आयटकची महिनाभराची यात्रा महत्वाची व जनतेतील भीती दूर करणारी आहे असे प्रतिपादन माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ.कल्याण काळे यांनी येथे केले.

संघ भाजपा हटाव संविधान और देश बचाव ही घोषणा देत गेल्या 10 दिवसापासून‌ विविध जिल्ह्यांत गेलेली आयटकची महासंघर्ष यात्रा आज औरंगाबादेत आली. त्यानिमित्त पैठण गेट येथे झालेल्या जाहीर सभेत कॉंग्रेसच्या वतीने शुभेच्छा देताना डॉ.काळे बोलत होते. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्याचे कार्याध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती होते. यात्रेच्या साठी औरंगाबादेत स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीच्या वतीने स्वागताध्यक्ष कॉ.अशफाक सलामी यांनी सर्वांचे स्वागत केले. आयटकचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ.अभय टाकसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हा सचिव कॉ.प्रकाश बनसोडे यांनी आभार मानले.

यावेळी आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ.शाम काळे (नागपूर), राज्य सचिव कॉ. राजू देसले (नाशिक), बॅंक करमचाऱ्यांचे नेते कॉ.देविदास तुळजापूरकर, बीएस‌एन‌एल कर्मचाऱ्यांचे नेते कॉ.रंजन दाणी, भारतीय दलित पँथरचे रमेशभाई खंडागळे, भारतीय क्रांती दलाचे शैलेंद्र मिसाळ, रमाई फौन्डेशनचे प्रा.भारत शिरसाट, माकपचे कॉ.भगवान भोजने, लाल निशाण पक्षाचे एस.जी.शुत्तारी, श्रमिक मुक्ती दलाचे कॉ.सुखदेव बन, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या तारा बनसोडे व माया भिवसाने आदींनी कामगार कष्टकरी विरोधी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. आयटकच्या या यात्रेस शुभेच्छा देताना मित्र पक्ष व संघटनांच्या सर्व नेत्यांनी संघ भाजप सरकार 2024 घ्या निवडणूकात खाली खेचण्याचे आवाहन केले. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष युसुफ शेख, कॉंग्रेस नेते सोनावणे, आंबेडकरवादी नेते डॉ.संग्राम मौर्य, कॉ.मधुकर खिल्लारे,

कॉ.राजू हिवराळे, कॉ.प्रितम घनघावे, अनिता फावडे, वैशाली मकासरे आदी मान्यवर उपस्थित होते.

" नरेंद्र मोदी सरकारच्या काळात 20 कामगार कायदे रद्द करण्यात आले व त्यांचे चार लेबर कोड मध्ये रूपांतर करून कामगारांचे शोषण करण्याचा परवाना मालकांना देण्यात आला" असा आरोप कॉ.राजू देसले यांनी केला तर धर्माच्या नावाने ,जातीच्या नावाने विष पेरण्याचे ,ध्रुवीकरण करण्याचे व 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे संघ भाजप सरकार रचत असल्याची टीका कॉ.शाम काळे यांनी केली.‌

18 डिसेंबर रोजी एक लाख श्रमिकांचा विराट मोर्चा नागपूरात काढून या यात्रेचा समारोप होईल असे कॉ.राम बाहेती यांनी यावेळी सांगितले.

कामगार विरोधी- जनविरोधी, मनुवादी, धर्मांध संघ भाजप सरकार सरकार चले जाव अशी घोषणा देत आयटक‌ या भारतातील 103 वर्षाचा इतिहास असलेल्या कामगार संघटनेच्या वतीने निघालेली महिनाभराच्या महासंघर्ष यात्रेस ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून आणखी 18 दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करुन जनजागरण करत आहे. 

आजच्या जाहीर सभेसाठी अंगणवाडी कर्मचारी, घाटीतील सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी,आशा स्वंयसेविका, फेरिवाले, औद्योगिक कामगार, बांधकाम कामगार,रिक्षा युनियनचे कार्यकर्ते ,नागरिक व विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्सूल टि पॉईंट येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर तेथून भडकले गेट,मिल कॉर्नर,

औरंगपूरा मार्गे पैठणगेट पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या मार्गावरील अण्णा भाऊ साठे,डॉ.आंबेडकर,शाहु महाराज,म.फुले यांच्या पुतळ्यास आयटकच्या पुढाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जाहीर सभेपूर्वी सुमारे १ तास पैठण गेट येथे शाहीर धम्मा खडसे (अमरावती) व‌ शाहीर सदाशिव निकम (कोल्हापूर) यांच्या कलापथकाचा कार्यक्रम झाला. यास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow