महाविकास आघाडीच्या वतीने जायकवाडीत जलपूजन
महाविकास आघाडीतर्फे जायकवाडी येथे जलपूजन
पैठण,दि.28(डि-24 न्यूज) सतत दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेला मराठवाडा सुजलाम सुफलाम होवो. अशी प्रार्थना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
महाविकास आघाडीतर्फे जायकवाडी येथे जलपूजन करण्यात आले. जायकवाडीच्या वरच्या धरणांतून सध्या 23 हजार क्युसेक्स याप्रमाणे पाणी सोडण्यात येत असून मध्यरात्री नंतर नाथसागरात 2 टीएमसी पाणी दाखल झाले आहे. आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते जलपुजन करून गोदामातेला विधीवत साडीचोळी व श्रीफळ अर्पण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेस नेते, माजी मंत्री अनिल पटेल, कल्याण काळे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, यांच्या मुख्य उपस्थितीत धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीवरुन हे जलपुजन पार पडले. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवण्यासाठीच्या लढ्याला यश मिळाल्यावर आता वरच्या धरणांतून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे. एकुण साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. पैकी 2 टीएमसी पेक्षा जास्त पाणी आज नाथसागर जलाशयात पोहोचले आहे. आणखी 3 ते 4 दिवसात संकल्पित पाणीसाठा जलाशयात सामावणार आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
या पार्श्वभूमीवर जलपुजन विधीसाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी पैठण तालुकाप्रमुख मनोज पेरे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक राखी परदेशी, माजी मंत्री अनिल पटेल, माजी महापौर सुदाम सोनवणे, विनोद तांबे, माजी आमदार संजय वाघचौरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र लघाने, ज्येष्ठ शिवसैनिक राजूसेठ परदेशी, उपजिल्हाप्रमुख राजू इंगळे, निमेश पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हरिशचंद्र माऊली मुळे, रमेश खांडेकर, संतोष तांबे, शिवाजी बावने, संभाजी काटे, गोविंद तात्या शिंदे, चंद्रकांत झारगड, उमेश पंडुरे यांच्यासह मोठ्याप्रमाणात आंदोलक, शेतकरी, ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?