उद्या उत्साहात गणेश विसर्जन, काही रस्ते बंद, पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा

 0
उद्या उत्साहात गणेश विसर्जन, काही रस्ते बंद, पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा

उद्या उत्साहात गणेश विसर्जन, पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा...

शहर पोलिस बंदोबस्तात तैनात....

 औरंगाबाद,दि.27(डि-24 न्यूज) शहरात श्री गणेश उत्सव अतिशय भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे. उद्या गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाना भावपूर्ण निरोप देण्यासाठी दिवसभर विविध मिरवणुकीत सहभागी होत असतात. पारंपरिक संस्थान गणपती मिरवणूक सर्वांचे आकर्षण तर अन्य गणेश मंडळाच्या मिरवणूक देखील पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. विसर्जन देखील निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस दलाने पूर्ण तयारी केली असून वरिष्ठ अधिकारी आणि हजारो पोलीस उद्या रस्त्यावर असणार असल्याचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपायुक्त आयपीएस नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहरात 15 महत्त्वाच्या मिरवणुका निघणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला छावणी व दौलताबाद हद्दीतील विसर्जन मिरवणूक निघणार आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणार्‍या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 111 ठिकाणी फिक्स पॉइंट असतील. मुख्य मिरवणूक (संस्थान गणपती ते जिल्हा परिषद मैदान), सिडको हडको, एमआयडीसी सिडको ठाणे हद्दीतील चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन औरंगाबाद, एमआयडीसी वाळूज हद्दीतील वाळूज महानगर, वाळूज, दौलताबाद हद्द, हर्सूल, सातारा हद्द, छावणी, जिन्सी या आहेत. मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर उंच हॉटेल, इमारतीवरही पोलिस बंदोबस्त लावला असून या मार्गावर 10 ठिकाणी उंच इमारतीवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुख्य मिरवणूक ही क्रांती चौक पोलिस ठाणे आणि सिटी चौक या दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे. याच मार्गावरील दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गल्ली बोळात जवळपास शंभरावर पोलिस बंदोबस्तासाठी असणार आहे.

तगडा बंदोबस्त तैनात 

पोलिस आयुक्त-1,

पोलिस उपायुक्त-4,

सहाय्यक पोलिस आयुक्त-6,

पोलिस निरीक्षक-42,

सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक 140,

अमंलदार - 2332,

होमगार्ड - 475,

शिघ्र कृती दल - 1 कंपनी

राज्य राखीव दल - 2 तुकड्या बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे. जे रस्ते बंद असतील वाहनधारकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. ज्या रस्त्यावर मिरवणूक निघणार आहे ते रस्ते बंद असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow